Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पावसाचे पुनरागमन : ना. अनिल पाटलांनी भूमातेले वंदन करून मानले आभार !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाल्याचा आनंद मंत्री ना. अनिल पाटील यांनी अनोख्या पध्दतीत साजरा केला.

तब्बल महिन्याभरापासून पाऊस नसल्याने राज्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. सर्वांच्या नजरा या आभाळाकडे लागल्या होत्या. सर्व धर्मियांकडून पावसासाठी देवाला घालण्यात साकडे घालण्यात आले होते. दरम्यान, कालपासून पावसाचे पुनरागमन सुरू झाले आहे. जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर येथे भूमातेला नारळ फोडून देवाचे आभार मानले.

गेल्या महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्याने राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पाऊस पडावा म्हणून राज्यभरात सर्व दरम्यान कडून नमाज असेल प्रार्थना असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीने साकडे घालण्यात आले होते. पावसाने पुनरागमन केल्याने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी भर पावसात रस्त्यावर उतरून भूमातेला नारळ फोडून देवाचे आभार मानले आहेत.

मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी श्रावण सोमवार निमित्ताने महादेवाच्या निघालेल्या कावड यात्रेत सहभागी होत पावसासाठी साकडे घातले होते..देवाने प्रार्थना कबूल केल्याने ज्या भुमातेत मंत्री पदाची संधी मिळाली त्याच अमळनेर येथे मंत्री अनिल पाटील यांनी भुमातेचे पूजन करून नारळ फोडून देवाचे आभार मानले आहेत.

भर पावसात कुठलेही पद्धतीने छत्री न घेता, मंत्री पाटील व त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, पावसात पूर्णपणे भिजत मंत्री अनिल पाटील यांनी भुमातेचे वंदन करत आभार मानले. संकटात सापडलेल्या शेतकर्‍याला काही प्रमाणात का होईना या पावसामुळे दिलासा मिळणार असून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती त्यावरही काही प्रमाणात हा पाऊस फायदेशीर ठरणार असल्याचं मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version