Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सापडलेला मोबाईल प्रामाणिकपणे केला परत; पोलीस स्टाफने केला सत्कार

सावदा ता.रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात सापडलेला मोबाईल प्रामाणिकपणे एका नागरिकाने परत केल्याची घटना आज घडली असून पोलीस स्टाफच्या वतीने त्यांचा शाल आणि श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

आज मंगळवार, दि. २८ जून रोजी गहुखेडा ता. रावेर येथील विभीषण संतोष तायडे सावदा शहरातील बाबुसेठ यांचे पेट्रोलपंपाजवळ पेट्रोल भरण्यासाठी

गेले असता त्यांना पेट्रोल पंपासमोर रोडवर ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल पडलेला असतांना दिसला.

त्यांनी सदसद्विवेक बुद्धीने विचार करत त्यांना सापडलेला मोबाईल हा सावदा पोलीस स्टेशन येथे आणून पोहेकॉं. संजीव चौधरी यांच्या स्वाधीन केला.

यावेळी पोहेकॉं. संजीव चौधरी, विनोद पाटील, उमेश पाटील यांनी संबंधीत मोबाईलच्या मूळ मालकाचा शोध घेऊन सावदा ता. रावेर येथील सुनिल मधुकर महाजन यांना त्यांचा हरवलेला परत केला.

मोबाईल पोलीस स्टेशन येथे आणून दिल्याबद्दल गहुखेडा ता. रावेर येथील विभीषण संतोष तायडे यांचा पोलीस विभागातर्फे सपोनि डी. डी. इंगोले आणि पोलीस स्टाफ यांनी शाल आणि श्रीफळ देवून सत्कार केला.

Exit mobile version