Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अरूणा पाटील यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील देवगाव देवळी येथील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत नुकताच शाळेच्या उपशिक्षिका अरुणा पाटील यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख गोकुळ पाटील तर प्रमुख पाहुणे देवगाव देवळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खेमराज बोरसे, संजय जगताप, श्रीनिवास पाटील, त्र्यंबक रणदिवे, वर्षा पाटील, सरिता जाधव होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र गावित यांनी केले.
देवगाव देवळी येथील प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका अरुणा पाटील यांनी ३५ वर्षे सेवा यशस्वीपणे पार पाडली . त्यांचे अध्यापनाची सुरुवात निंभोरा नंतर लोंढवेे ,मंगरूळ, गडखांब, पिंपळे, टाकरखेडा ,आणि देवगाव देवळी उच्च प्राथमिक शाळेमध्ये सेवानिवृत्त झाल्या. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. देवळी देवळी येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खेमराज बोरसे म्हणाले की अरुणा पाटील यांनी आपल्या अध्यापनात कधीही तडजोड केली नाही. त्यांच्या ३५ वर्षांच्या सेवेत ते इमानेइतबारे काम केलं त्यांना सेवापूर्ती देताना आनंद दुःख होतं असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात गोकुळ पाटील म्हणाले की शिक्षक आपल्या सेवेत कधी सेवानिवृत्त होत नाही सेवानिवृत्तीनंतरही त्याचे काम हेच सुरू असते सेवानिवृत्त झाल्यानंतर शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी व समाजाला मार्गदर्शन करावे. याठिकाणी सेवापूर्ती चा अत्यंत चांगल्या प्रकारचा कार्यक्रम याठिकाणी जिल्हा परिषद शाळेने घडवून आणला मी मुख्याध्यापकांचे व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो व आभार मानतो.
देवगांव देवळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खेमराज बोरसे, शिक्षक बंधू-भगिनी यांच्यावतीने अरुणा पाटील यांना भेटवस्तू देऊन त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला. यावेळी रतिलाल महाले, अरविंद सोनवणे ,रेखा सोनवणे, ज्ञानेश्‍वर पाटील ,राजेंद्र गवते, रतिलाल महाले, संजय पाटील,व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version