Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिवाळीपूर्वी सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन मिळावे

अमळनेर प्रतिनिधी । नगरपालिकेने सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन दिवाळीपूर्वी करून त्यांची दिवाळी गोड करावी, असे आवाहन नागरी हित दक्षता समितीतर्फे करण्यात आलेले आहे.

नागरी हित दक्षता समिती कार्यकारिणीच्या बैठकीत श्रावण गुरुजी  व  सत्तार मास्टर यांनी सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षकांची आर्थिक परिस्थितीचा प्रश्न कथन केला. नागरी दक्षता समिती ही सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षकांसोबत आहे, असे आश्वासन समितीचे अध्यक्ष यांनी दिले. समितीचे सचिव बन्सीलाल भागवत यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी मगन पाटील , प्रा. डॉ राहुल निकम, सुनील अहिरराव, हमीद गुरुजी ,शालीग्राम पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. समितीचे संचालक संदीप जैन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार अॅड. आर. जी. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी लोटन धर्मा कोळी व मंगल हिरामण पाटील हे उपस्थित होते.

 

Exit mobile version