Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खोटे नगरातून सेवानिवृत्त शिक्षकाची दुचाकी लांबविली

खोटे नगरातून सेवानिवृत्त शिक्षकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खोटे नगर येथील सेवानिवृत्त शिक्षकाची घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात सेवानिवृत्त शिक्षक भैय्यासाहेबत हिराजी पाटील (वय-६४) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी ८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता त्यांनी त्यांची मालकीची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीडब्ल्यू ९०८४) ही घराच्या समोर पार्कींग लावलेली होती. मध्यरात्री ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीला आली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश पाटील करीत आहे.

Exit mobile version