Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निर्बंध शिथील होणार मात्र काही नियम कायम राहणार !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोरोना रूग्णसंख्या कमी होत असल्याने केंद्र सरकारने राज्यांना नियम शिथील करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र कोरोनाचे पूर्ण उच्चाटन न झाल्यामुळे काही नियम कायम राहणार आहेत.

देशातील करोना रुग्णआलेख घसरला आह़े त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या आणि चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या प्रमाणाचा आढावा घेऊन करोनाचे अतिरिक्त निर्बंध मागे घ्यावेत, अशी सूचना केंद्राने   राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली़  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे ‘‘देशात करोना रुग्णसंख्येचा आलेख २१ जानेवारीपासून घसरलेला दिसतो़  गेल्या आठवडयात सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या ५०,४७६ इतकी नोंदविण्यात आली़  गेल्या २४ तासांत २७,४०९ नवे रुग्ण आढळल़े दिवसभरात करोना चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण ३६३ आढळले’’ याकडे पत्रात लक्ष वेधण्यात आले आह़े

रुग्णवाढीनंतर अनेक राज्यांनी आपल्या सीमा आणि विमानतळांवर अतिरिक्त निर्बंध लागू केले  सार्वजनिक आरोग्य संकटाला तोंड देताना या उपाययोजना करणे आवश्यक आहे.  मात्र राज्यातील प्रवेशद्वारांवर तेथील सरकारांनी लागू केलेल्या अतिरिक्त निर्बंधांमुळे प्रवास आणि आर्थिक व्यवहारांना अडथळा येऊ नये, याचीही काळजी घ्यायला हवी,’’ असे राजेश भूषण यांनी या पत्रात म्हटले आह़े

सध्या देशभरात दैनंदिन रुग्णसंख्या घटत असल्याने राज्यांनी तेथील करोनास्थितीनुसार निर्बंधांचा आढावा घ्यावा आणि ते कमी करावेत, असे निर्देश देताना केंद्राने परदेशांतून येणार्‍या प्रवाशांसाठीचे निर्बंध नुकतेच शिथिल केल्याचा दाखला राजेश भूषण यांनी पत्रात दिला आहे.

दरम्यान, निर्बंध हळूहळू कमी करताना करोना प्रतिबंधासाठी चाचणी, रुग्णशोध, उपचार, लसीकरण आणि नियम पालन या पंचसूत्रीवर भर देण्याची गरज केंद्राने अधोरेखित केली़  रुग्णसंख्या आणि लसीकरणाचा दैनंदिन आढावा घेण्याची सूचनाही केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे.

 

Exit mobile version