Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात श्री गुरुदेव दत्त मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील महाराणा प्रताप चौक रिक्षा स्टॉप व पोलिस मदत केंद्र व भाविकांच्या उदार सहयोगाने आज दि. १३ रोजी शहरातील महाराणा प्रताप चौकात असलेल्या श्री गुरुदेव दत्त मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

दत्त कॉलनीतील सचिन सोमवंशी यांचे निवासस्थाना पासुन ते श्री गुरुदेव दत्त मंदिरापर्यंत दत्तांची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. तद्नंतर श्री गुरुदेव दत्त मंदिरात पुणे येथील मिथुन वाईकर व जानवी मिथुन वाईकर या दाम्पत्यांच्या हस्ते होम हवन करण्यात आले.

प्रसंगी वैभव जोशी, प्रसाद जोशी, अनिल जोशी, अरविंद सोनार, दत्तात्रय कुलकर्णी या महाराजांनी मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा करण्याबाबत मार्गदर्शन केले. सदरचे मंदीर सन २००४ साली स्थापन करण्यात आले होते त्यावेळी पत्रकार सचिन सोमवंशी, पोलीस कर्मचारी प्रकाश पाटील, यशवंत घोरसे, राजेंद्र बागुल, सुनील पवार आदींनी पुढाकार घेऊन जनतेतुन सार्वजनिक वर्गणी करुन मंदीराचे निर्माण केले होते. आज पुन्हा मोठ्या स्वरुपात मंदीराचा जिर्णोद्धार झाला आहे. यावेळी श्रीराम मंदिर पाचोराचे महंत निळकंठ महाराज, काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, मंदिराचे अध्यक्ष प्रविण मधुकर मोरे, नंदु सोमवंशी, पोलिस हवालदार प्रकाश पाटील सह महराणा प्रताप चौक रिक्षा स्टॉपचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 

Exit mobile version