Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेच्या कुरंगी – बांबरुड जनसंवाद मेळाव्यास प्रतिसाद

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथील श्रीराम टेकडीवर आगामी काळात होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, शेतकरी संघ, मार्केट कमिटीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कुरंगी – बांबरुड जि. प. गटाचा शिवसेना – युवासेनेचा जनसंवाद मेळावा आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनिल पाटील, पंढरीनाथ पाटील, प्रविण ब्राम्हणे पाचोरा, पंढरीनाथ गोविंदा पाटील, सुधाकर पाटील, संजय पाटील, योगेश पाटील, गणेश पाटील, सुभाष तावडे, विनोद तावडे, शिवाजी तावडे, डी.के.पाटील, इम्रान पटेल, विश्वनाथ सुर्यवंशी, योगेश सुर्यवंशी, रमेश पाटील (निंभोरी), बापू पाटील (माहेजी), हेमराज पाटील (मोहाडी), जयविर पाटील (दहिगाव), योगेश पाटील (डोकलखेडा), सुनिल पाटील (कुरंगी), डॉ. शेखर पाटील, अशोक बडगुजर, युवराज काळे, प्रकाश चौधरी, रोशन पाटील, स्वप्निल तावडे, मुराद तडवी, शिवसेना युवा सेनेचे दिनकर सोनवणे, शरद पाटील, किरण पाटील, रोहित पाटील यांच्या सह शिवसेना युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माहेजी ते हनुमंतखेडा, गिरणा नदीवरील पुलासाठी वीस कोटी चार लाख निधी मंजूर केला म्हणून जि. प. गटातील सर्व ग्रामपंचायतींच्या वतीने आमदार किशोर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार किशोर पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आम्ही गद्दार नसून खुद्दार आहेत” असं सांगत पंचवीस वर्ष राष्ट्रवादी व काँग्रेसच्या विरोधात आम्ही संघर्ष केला. त्यांच्या सोबत आम्ही सत्तेत सहभागी झालो. आधी एकनाथ शिंदे यांना विधीमंडळ नेता म्हणून घोषित केले आणि वेळेवर महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साधा ग्रामपंचायतीचासुद्धा अनुभव नव्हता. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करुन आपण सरकार चालवण्याचे मनसुबे यांचे होते. आम्ही वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. म्हणून एक नव्हे तब्बल चाळीस आमदार विरोधात गेले. गेल्या अडीच वर्षांपासून थांबलेल्या विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मी शिंदे गटात गेलो.” असे त्यांनी सांगीतले. पुढे ते म्हणाले की, “मुख्यमंत्री शिवसेनेचा असतांना कमी प्रमाणात निधी मिळत होता. शिवसेना भाजप सरकारने दिड महिन्यात आपल्या पाचोरा – भडगाव मतदारसंघात ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यात माहेजी येथील गिरणा नदीच्या पुलासाठी २० कोटी रुपये निधी या गटासाठी दिला. तरुणांसाठी मतदारसंघात २ कोटी रुपयांचे व्यायामाचे साहित्यासाठी निधी मंजूर केला असून ते साहित्य लवकर वाटप करण्यात येणार आहे. दहीगाव ते प्रिंप्री गिरणा नदीवरील पुलासाठी लवकर निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

वनविभागातील वन्य प्राणी शेतकऱ्यांचा पिकांचे मोठ्या नुकसान करतात त्या वनविभागाला संरक्षण करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच वालकुंपणाला मंजुरी मिळणार आहे. त्याच बरोबर बहुळा धरणावरुन पहाण, आसनखेडा, लासगावपर्यंत नवीन पोटचारीचा प्रस्ताव सादर सादर करुन त्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मतदार संघातील ८०० किलोमीटरच्या शेत रस्ते सुद्धा मंजूर करण्यात आले असून यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी आमदार किशोर पाटील यांनी केले.

‘नाराज शिवसैनिकांना भेटुन त्यांच्या नाराजी दूर करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. मी विकास कामांच्या निधीतून मोठ्या प्रमाणावर मतदारसंघात विकास केलेला असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नगराज पाटील व प्रा. यशवंत पवार यांनी केले.

Exit mobile version