Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिंगोणा येथे मोफत ई-श्रमकार्ड नोंदणी महाअभियानाला प्रतिसाद

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  तालुक्यातील हिंगोण येथे डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवाराच्या वतीने मोफत ई-श्रमकार्ड नोंदणी महाअभियान राबविण्यात आले. या अभियानाला ग्रामीण भागातील ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत आहे.

 

यावल तालुक्यातील हिंगोणा गावातील नागरीकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळावा, याकरीता तालुक्यातील विविध ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या श्रमजिवी कुटुंबास शासकीय योजनाचा लाभ मिळवण्यासाठी अत्यावश्यक असणारे ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानाला सुरूवात करण्यात आली आहे.  या अभियान हिंगोण येथील विकास सोसायटीच्या पटांगणात घेण्यात आले.  ४८९ लाभार्थ्यांनी  या अभियानाचा लाभ घेतला. यावेळी मोफत ई-श्रम कार्ड अभियानाचे उद्घाटन डॉ.कुंदन फेगडे यांच्याहस्ते करण्यात आले.

 

या प्रसंगी गावाचे सरपंच रुकसाना फिरोज तडवी, फिरोज तडवी, मनोज वायकोळे, महेंद्रसिंग पाटील, ज्ञानुसिंग  पाटील, संतोष सावळे, शशिकांत चौधरी, सागर महाजन, विष्णू महाजन,  सुभाष गाजरे, चंद्रकांत महाजन,  युवराज गाजरें,बिसा तडवी,  गौरव बाविस्कर, हरेश भोळे, तुषार कोळी, अतुल गाजरें,  युगंधर नेमाड़े, यश कोळी,  शुभम कोळी, भगवान पाटिल, कपिल कोळी, महेश राणे,  हर्षल धनगर,  स्वाती सपकाळे, वीणा लाखारा, चारुलता गुडवे, उशा पाटील, रंजना पाटील, आशा तडवी, मिनाक्षी कोळी,आदींची उपस्थिती होती. सदरील अभियानास सागर लोहार, मनोज बारी, विशाल बारी, हर्षवर्धन मोरे,अक्षय राजपूत, चेतन कापुरे, शुभम सोनवणे यांचे कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी योग्य सहकार्य लाभले.

Exit mobile version