Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दहीगाव, मोहराळा व सावखेडासिम येथे लसीकरणासाठी नागरीकांचा प्रतिसाद

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंन्द्राअंतर्गत येणाऱ्या दहीगाव व मोहराळा येथे आज कोविड प्रतिबंधक लसीकरणास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावल शहरासह तालुक्‍यात विविध प्राथमिक आरोग्य केन्द्रावर मुबलक प्रमाणात कोविशील्ड लसीचे डोस प्राप्त झाल्याने १ सप्टेंबर बुधवार रोजी तालुक्‍यातील सर्वच कोविड लसीकरण केंद्रावर लसीकरण घेण्यात आले. 

प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडा सीम व या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र  दहिगाव, मोहराळा येथे नागरिकांना गावपातळीवरच लसीकरण सेवा उपलब्ध व्हावी म्हणून आवश्यकतेनुसार व लस साठा उपलब्धतेनुसार कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आलेत या करीतातालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्‍हाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका शोभा चौधरी व आरोग्य सहाय्यक एल. जी. तडवी हे करीत आहेत.

 

संपन्न झालेल्या लसीकरणाच्या कार्यक्रमास १८ वर्षावरील तरुण-तरुणींनी व नागरिकांनी लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दहिगाव ग्राम पंचायत लसीकरण केंद्रावर नंबर लावण्यावरून दोन वेळेस लसीकरण केंद्रावर वाद उद्भवला होता. त्यामुळे काही काळ लसीकरण बंद करण्यात आले होते.

१८ वर्षावरील व ४५ वर्षावरील दहिगाव येथे ४००, सावखेडासिम येथे ३०० व मोहराळा येथे ३०० असे आज १००० नागरिकांना लस देण्यात आली. यावेळी दिव्यांग व्यक्ती, गरोदर माता, व दुसऱ्या डोस ला पात्र नागरिकांना प्राधान्य  देण्यात आले. 

लसीकरण प्रसंगी दहिगाव येथे सरपंच अजय अडकमोल, उपसरपंच किशोर महाजन, ग्रा. वि. अधिकारी योगेंद्र अहिरे व अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, प्रवीण सराफ  समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. खालीद शेख, डॉ. रोशनआरा शेख, राजेंद्र बारी, अरविंद जाधव, अभय नाले, भूषण पाटील, आरोग्य सेविका अनिता नेहते  शाबजान तडवी, व प्रतिभा चौधरी, दिपाली पाटील  ह्या आरोग्य पथकाने लसीकरण मोहीम राबविली. 

स्पॉट रजिस्टेशन अरविंद जाधव व भूषण पाटील  यांनी केले. शिबिरास चंद्रकला चौधरी, कल्पना पाटील, आशा सेविका पुष्पा पाटील, नीता महाजन, भाग्यश्री महाजन, अर्चना अडकमोल, संध्या बाविस्कर, निर्मला पाटील, योगिता पाटील तसेच दहिगाव ग्रा. पं. चे ग्राम विकास अधिकारी योगेंद्र अहिरे अरुण पाटील, नितीन जैन, विजय पाटील, व सुधाकर पाटील आदींचे विशेष सहकार्य लाभले.

Exit mobile version