Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुप्रीम कॉलनीतील रहिवाशांना मिळाले 12 दिवसांनी पाणी पुरवठा

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील नागरिकांना १२ दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने तर आज आ. राजूमामा भोळे व महापालिका स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे – पाटील यांच्या प्रयत्नाने आज पाणी पुरवठा झाला आहे. परिसरातील रहिवाशांनी आमदार व सभापतींचे आभार मानले.  

 

जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीमधील गजानन महाराज मंदिरामागील गल्ली व परिसरात केल्या 12 दिवसापासून पाणी पुरवठा झाला नव्हता. त्यामुळे परिसरातील जनतेचे हाल झाले. काही लोकांनी पाणी पिण्यासाठी 30 – 30 रुपयाची कॅन घेऊ तहान भागवली तर काहींनी शेजारील कंपनीत जाऊन कंपनी मालकाशी विनवणी करून पाणी मिळविले. तर काहींनी यथा पाण्याचे टँकर मागविले. अशा भीषण परिस्थितीचा विचार करून भाजपा युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर सोशल मीडिया प्रमुख भूषण जाधव यांनी गेल्या 12 दिवसात 4-5 वेळा जळगाव मनपा पाणी पुरवठा अभियंता भांडारकर यांच्याशी पाणी समस्याबाबत बोलणी केली.

 

भुषण जाधव यांनी आ. राजुमामा भोळे व जळगाव मनपाचे स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील तसेच अमित साळुंखे यांच्याशी बोलने केले. त्यानंतर राजुमामा भोळे व राजेंद्र घुगे पाटील यांनी सांगितले की, तुमच्या कडे 1 दिवसातच पाणी येईल. त्यानंतर आ. राजुमामा भोळे व जळगाव मनपाचे स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्याची कान उघडणी केल्यानंतर आज 3 मे 2021 सोमवार रोजी संध्याकाळी 5.30 वाजता पाणी पुरवठा झाला. पाणी पुरवठा झाल्याबद्दल परिसरातील रहिवाशांनी व भूषण जाधव यांनी आ. राजुमामा भोळे व जळगाव मनपाचे स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील तसेच अमित साळुंखे यांचे आभार मानले. मात्र जीवनावश्यक मूलभूत सुविधा कडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असेल तर अश्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशी व भुषण यांनी केली आहे.

Exit mobile version