Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

“विभागीय क्रीडा स्पर्धेत चाळीसगांव येथील निवासी शाळेचे सलग दुसऱ्या वर्षी घवघवीत यश

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नाशिक यांच्या वतीने आयोजित अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला/मुलींच्या शासकीय निवासी शाळांच्या, नाशिक विभागस्तरीय क्रीडा व कला अविष्कार स्पर्धा – २०२३-२४ चे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, धुळे येथे करण्यात आले होते.

या स्पर्धेचे उद्घाटन नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांच्या हस्ते फ्लॕग मार्च आणि क्रीडा ज्योत पेटवून तसेच हवेत बलून सोडून करण्यात आले. यावेळी धुळे समाजकल्याण सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. टिळेकर, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य शामकांत गुजांळ, समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर आदि उपस्थित होते.
या स्पर्धेत नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, या 5 जिल्ह्यातील संघानी 100 मी., 200 मी, 400 मी, रीले, रस्सीखेच, लांबऊडी, थाळीफेक तसेच भुमिका अभिनय व नृत्यसादरीकरण या विविध प्रकारात सहभाग घेतला होता.यामध्ये विभागीयस्तरीय कला – क्रीडा स्पर्धेत जळगांव जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळा चाळीसगाव येथील विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या वर्षी विजयीरथ कायम ठेवला. सदर क्रिडा स्पर्धेच्या एकूण १४ क्रिडा प्रकारांमधून १० क्रिडा प्रकारांत चाळीसगांव निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. सदर सहभागी खेळाडूंचे आणि निवासी शाळेचे मुख्याद्यापक, शिक्षक, गृहपाल, तालुका समन्वयक या सर्वांचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (भा.प्र.से.) व जळगाव समाजकल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिनंदन केले.

विजयी संघ व खेळाडू
मुलांची शासकीय निवासी शाळा चाळीसगांव जि. जळगांव
1. 100 मी. (14 वर्षाखालील) – प्रथम क्रमांक – पुष्कराज संजय जाधव
2. 100 मी. (17) वर्षाखालील) – द्वितीय क्रमांक – सम्राट अशोक सोनवणे
3. 200 मी. (14 वर्षाखालील)- प्रथम क्रमांक – रविंद्र दगडू खेडकर
4. 400 मी. (14 वर्षाखालील) प्रथम क्रमांक – सोमनाथ गरीबदास जवराळे
5. 400 मी. (17 वर्षाखालील)- प्रथम क्रमांक – विशाल सुनिल गाडगे
6. 400 मी (17 वर्षाखालील) द्वितीय क्रमांक. खुशाल जगन्नाथ बेलदार
7. रिले (17 वर्षाखालील) – द्वितीय क्रमांक
8. रिले (14 वर्षाखालील)- प्रथम क्रमांक
9. लांब उडी (14 वर्षाखालील)- प्रथम क्रमांक- पुष्कराज संजय जाधव
10.लांब उडी (17 वर्षाखालील) प्रथम क्रमांक-जय मनोज बैसाने
11. थाळीफेक (14 वर्षाखालील) प्रथम क्रमांक – यशवंत जीभाऊ निकम
12. रस्सीखेच (17 वर्षांखालील) प्रथम क्रमांक-निवासी शाळा चाळीसगाव
13.भूमिका अभिनय प्रथम क्रमांक – निवासी शाळा चाळीसगाव
1.पियुष जाधव 2.प्रतिक पगारे 3.बाॕबी अहिरे 4.गौतम बागुल
5.निशांत जाधव 6.लकी देवरे

Exit mobile version