Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फलोत्पादन महाविद्यालय स्थलांतरित न करण्याची मागणी

yaval 3

 

यावल प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील पाल ता. रावेर येथे फलोउत्पादन महाविद्यालय व प्रक्रिया केंद्रास इतर ठिकाणी स्थलांतरित न करतात, ज्याठिकाणी आहे त्याचठिकाणी राहू द्यावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेना यावल तालुका आदिवासी सेलच्या वतीने फैजपूर तहसीलदार साळूखें यांना नुकतेच देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य सरकारने पाल ता. रावेर जि.जळगाव अंतर्गत येणा-या फलोउत्पादन महाविद्यालय आणि प्रकिया केंद्रास मंजूरी मिळाली आहे. महाविद्यालयास स्थलांतरित न करतात, ज्याठिकाणी आहे त्याचठिकाणी राहू द्यावे, त्यामुळे स्थानिक बेरोजगार लोकांना रोजगार मिळेल तसेच फळप्रक्रिया यांना चालना मिळण्यास मदत होईल. म्हणून स्थलांतरित न करता त्याच गावात (पाल) येथे बांधण्यात यावे, तसेच या मतदार संघाचे लोकप्रतिनिधी व कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष ना. हरिभाऊ जावळे यांनी या महावि­द्यालय स्थलांतरित न होवु देता त्याच ठिका­णी देण्याची विनंती नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर या जा­गेची पाहणी करण्यासाठी आलेल्या समितीने असा कोणता अहवाल दिला की, ज्यामुळे महाविद्यालय स्थलां­तरित करण्याचा निर्णय घेतला ? याबाबत स्था­निक लोकप्रतिनिधींशी चर्चा का केली नाही ? आणि जागा स्थलांतरित करण्याचा घाट का घालत आहे. मिळालेला प्रकल्प समिती पळवण्याच्या मागे का ? असे विविध प्रश्न निवेदनाव्दारे विचारण्यात आले आहे. महाविद्यालय हे मंजूर आहे, त्यामुळे ते स्थालांतरित न करता, ज्याठिकाणी आहे त्याच ठिकाणी राहू द्यावे अन्यथा शिवसेना आदिवासी सेल यांच्यामार्फत ती­व्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदन देताना देण्यात आला आहे.

शिवसेना आदिवासी सेल यावल तालुका प्रमुख हुसेन तडवी, शिवसेना उपतालुका प्रमुख राजू काठोके, फैजपूर शहर शिवसेनाप्रमुख व नगरसेवक अमोल निंबाळे, शिवसेना महिला तालु­का प्रमुख रंजनी चौ­धरी, शिवसेना तालुका उपप्रमुख उदय चौधरी, फैजपुर युवासेना शहर अधिकारी गजानन रोडे, फैजपुर युवासेना उपशहर अधिकारी चेतन ठाकरे, यावल युवासेना उपशहर अधिकारी पिटुं कुंभार, ललीत निबांळे ,संजय तेली, निसार तडवी­, विजय मिस्तरी, इस्मा­इल खान, बिस्मीला तड­वी, अॅड. आकाश चौधरी यांच्यासह शिवसेना आदिवासी सेल आणि शिवसेना युवासेना कार्यकर्ते उपस्थितीत असून निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.

Exit mobile version