Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बांधकाम मजुरांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी शिवसेनेतर्फे निवेदन (व्हिडीओ)

majur

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी । अटल विश्वकर्मा योजने अंतर्गत बांधकाम मजुरांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, या प्रमुख मागणीचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी हजारो बांधकाम मजुरांच्या उपस्थितीत आज (दि.16) रोजी गटविकास अधिकारी व बांधकाम अभियंत्यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण राज्यात अटल विश्वकर्मा योजने अंतर्गत सदैव वंचित राहिलेल्या बांधकाम मजूर यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, म्हणून राज्यभर ऑनलाईन पद्धतीने नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. तशी नोंदणी अनेक मजुरांनी केली, देखील मात्र त्यांना आजातागत शासन स्तरावरून काहीच पत्रव्यवहार संबंधीत मजुरांशी झालेला नाही. उलट येत्या विधानसभा निवडणुकीला समोर ठेवत गेल्या आठवड्यात लोकप्रतिनिधींच्या एका खाजगी आयटीआय मध्ये नोंदणी सुरू करण्यात आली होती. मात्र ही नोंदणी अचानक बंद करण्यात आली. तेव्हा शहर व तालुक्यातील हजारो मजूर या नोंदणीपासून वंचित आहेत. त्यामुळे योजनेच्या जीआर (माहितीपत्रक) नुसार या नोंदणी केंद्र हे नगरपंचायत व तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायती स्तरावर सुरु करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले असून ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.

जिल्हा नियोजन समिती सदस्य ॲड मनोहर खैरनार, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, अल्पसंख्याक संघटक अफसर खान, माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, तालुका संघटक प्रवीण चौधरी, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, माजी उपतालुका प्रमुख राजेंद्र तळेले, शहर संघटक वसंत भलभले, शहर प्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे, नगरसेवक संतोष मराठे, देवानंद वंजारी, संदीप बगे, प्रशांत भोलाने, आकाश सापधरे, संतोष माळी, कैलास वंजारी, सुभाष माळी, बाळा भालशंकर, राजेंद्र कापसे, योगेश काळे, मनोज मराठे, सोपान तायडे यांच्यासह असंख्य शिवसैनिक तसेच बांधकाम मजूर उपस्थितीत होते.

Exit mobile version