Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किराणा दुकानात वाईन दारू विक्रीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विरोध (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । राज्य शासनाने किराणा दुकानात वाईन दारू विक्रीसाठी दिलेली परवानगी मागे घ्यावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे  महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने गेल्या आठवड्यात किराणा दुकानात आता वाईन दारू ठेवण्यासाठी व विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान किरणा दुकानात लहान मुले महिला जात असतात. या निर्णयामुळे त्यांच्यावर वाईट परिणाम होतील, राज्य शासनाच्या हा निर्णय अत्यंत चुकीचा असून सरकारने फेरविचार करावा, अशा प्रकारे किराणा दुकानात वाईन विक्रीस ठेवल्याने ग्राहक तिथ फिरकणार नाही, त्यामुळे दुकानदारांचे नुकसान होईल त्यामुळे राज्य शासनाने वाईन दारू विक्रीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्या वतीने सोमवारी ३१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.

 

या निवेदनावर रिपाइंचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, जिल्हा सचिव भरत मोरे, युवक अध्यक्ष मिलींद सोनवणे, उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, कार्याध्यक्ष सागर सपकाळे, अक्षय मेघे, किरण अडकमोल, अनिल लोंढे, भिमराव सोनवणे, संदीप तायडे, विशाल महाले, लताबाई सोनवणे, शुभांगी भांडारकर, जनाबाई तायडे, वत्सलाबाई आगळे, रजूबाई सुरवाडे, लिलाबाई सोनवणे, शोभा सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Exit mobile version