Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

२३ जानेवारीपासून सुरू होणारा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा

नवी दिल्ली वृत्तसंस्था | केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत प्रजासत्ताक दिनाचा सोहळा २४ ऐवजी २३ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  २३ रोजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिनाची सुरुवात आता २४ जानेवारी ऐवजी २३ जानेवारीला होणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची २३ जानेवारीला जयंती असते, त्यापार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.  सरकारने यापूर्वी सुभाषचंद्र बोस यांची जयंती  पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

तर १४ ऑगस्टला स्मरण दिवस तर ३१ ऑक्टोंबरला राष्ट्रीय एकता दिवस तर १५ नोव्हेंबरला जनजातीय गौरव दिवस, २६ नोव्हेंबरला संविधान दिवस आणि वीर बाल दिवस साजरा करणाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्यात आता सुभाषचंद्र बोस यांची जयंती प्रजासत्ताक दिनाच्या समारोहात साजरी केली जाणार आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडीत देशभरातील स्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने एक योजना आखली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये पीटीआयने सांगितले होते की, २१ ऑक्टोबर १९४३ रोजी बोस यांनी जाहीर केलेल्या तात्पुरत्या सरकारच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालय कार्यक्रमांचा भाग म्हणून क्युरेटेड टूरचे नियोजन करत आहे. असे म्हटले होते. यानंतर आता प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचा समावेश करण्यात आलेला आहे.

 

Exit mobile version