Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव येथील शिवसेना कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव येथे २६ जानेवारी २०२४ हा ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शिवसेना कार्यालय येथे आदिवासी महिला द्रौपदीबाई हिरामण भिल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला नंतर त्यांचा रेखाताई भागवत चौधरी यांच्या हस्ते साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, उषाताई गुलाबराव वाघ, युवासेनेचे जिल्हाप्रमुख श्री निलेशभाऊ चौधरी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरदभाऊ माळी, उपजिल्हासंघटक, राजेंद्रजी ठाकरे जेष्ठ शिवसैनिक पांडुरंग भादु महाजन, शिवसैनिक राजेंद्र विठ्ठल बोरसे, छोटुभाऊ चौधरी, शेरू खान, किशोर आफ्रे, लखन पटोणे, फिरोजभाई खान, रवींद्रभाऊ सोनार, दिलीपबापू महाजन, कृपाराम महाजन, सुनील रामा चव्हाण, जीतूभाऊ धनगर, भीमराव धनगर, राहुल रोकडे, रवींद्र जाधव, परमेश्वर महाजन, दिनेशभाऊ येवले, किशोर महाजन, गोपाल महाजन, चेतन जाधव, यशवंत वऱ्हाडे, किरण मराठे, रणजित पुरभे, बापू महाजन, शरद पाटील, विनोद रोकडे, पप्पू सोनार, किरण अग्निहोत्री उपस्थित होते.

Exit mobile version