Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिट ॲन्ड रन कायदा रद्द करा; पाचोऱ्यात ट्रकचालकाचे आंदोलन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्र सरकारने नुकतेच लागु केलेल्या “हिट अँड रन” कायद्या अंतर्गत दोषी आढळल्यास १० वर्षांची शिक्षा व ५ लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सदर कायद्या विरोधात महाराष्ट्र राज्य ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था व एकता ट्रक चालक मालक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य रस्त्यावर उतरून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच लागु करण्यात आलेल्या “हिट अँड रन” कायद्याच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे व पोलिस प्रशासनास निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्थेचे व एकता ट्रक चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निषेधास राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. नगरसेवक विकास पाटील यांनी जाहिर पाठिंबा दर्शविला असुन केंद्र सरकार विरोधात विकास पाटील यांनी रोष व्यक्त केला आहे.

अपघात घडल्यास जखमींना मृत्युच्या दारी सोडून पळून जाणे हे प्रत्येक मानवी मनाला पटण्यासारखे मुळीच नाही. परंतु स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणे हा गुण प्रत्येक प्राणी मात्रा मध्ये जन्म जात असल्या कारणाने आणि आपल्या भारत देशा मध्ये दलित आणि आदिवासी यांच्यासाठी जशी कठोर कायद्याची तरतूद आहे. तशा एखाद्या कठोर कायद्याचे संरक्षण ड्रायव्हरला नसल्या कारणाने ड्रायव्हर हा केवळ स्वतःच्या जिवाच्या भितीने अपघात स्थळा वरुण पलायन करतो. ड्रायव्हर सुरक्षा कायद्याची प्रथमतः अंमलबजावणी करणे आणि त्यानंतर “हिट अँड रन” या कायद्या मध्ये कारावासाचा कालावधी व आर्थिक दंड यामध्ये कमतरता करुन त्या नंतरच कायदा लागू करण्यात यावा. अशा आषयाचे निवेदन ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था व एकता ट्रक चालक मालक संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे व पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना देण्यात आले. पोलिस स्टेशनचे निवेदन ठाणे अंमलदार विकास खरे यांनी स्विकारले.

Exit mobile version