Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळातील सिंधी कॉलनीत बंद घरातून सोन्याचे दागिने लांबविले

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी परिसरात डुप्लीकेट चाबीने घरात घुसू घरातून ६६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, सोना प्रकाश सदवानी (वय-४५) रा. सिंधी कॉलनी जळगाव ह्या आपल्या परिवारासह राहतात. ३ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान ते कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या मदतीने घरात प्रवेश करून कपाटातील दोन तोळ्याची सोन्याचे सोने, ४ ग्रॅम सोन्याचे कानातले दागिने आणि सोन्याची दागिने असा एकुण ६६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून पुन्हा बनावट चावी घराला कुलूप लावून गेले. सोना सदवानी ह्या ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता घरी आल्या असता घरात चोरी झाल्याचे दिसून आले. महिलेच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जयराम खोडपे करीत आहे. 

 

Exit mobile version