Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाडळसरे धरण पूर्तीसाठी शिवसेनेचे खासदार उन्मेश पाटील यांना स्मरणपत्र

5faf92f3 b29d 41bb 9c68 17bdadcf2377

अमळनेर (प्रतिनिधी) शिवसेना भाजप महायुतीचे जळगांव लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील यांनी आज (दि.२) येथे भेट दिली त्यावेळी शिवसेनेतर्फे त्यांचा सत्कार करून पाडळसरे धरण पूर्ण करणेसाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाकडून भरीव निधी आणण्यासाठी शिवसेनेतर्फे ‘स्मरणपत्र’ देण्यात आले व ह्या कामाची आठवण करून देण्यात आली.

 

सदर प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, तालुकाप्रमुख विजू मास्तर, नगरसेवक संजय पाटील, माजी शहर प्रमुख नितीन निळे, माजी उपजिल्हाप्रमुख देवेन्द्र देशमुख, शहर संघटक चंद्रशेखर भावसार,उपशहरप्रमुख मोहन भोई,सह भाजपाचे माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील, सुभाष चौधरी, ऍड व्ही.आर. पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर खासदारांनी पाडळसरे धरणस्थळी जाऊन कामाची व सद्यस्थितीची पाहणी करून माहिती घेतली. यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी एक-दोन दिवसांत चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी पदाधिकार्‍याना यावेळी दिली. नव निर्वाचित खासदारांनी प्रथमच तालुक्यातील सर्वांसाठी महत्वाचा प्रश्नांवर लक्ष घातल्याने शिवसेनेतर्फे डॉ. राजेंद्र पिंगळे उपजिल्हाप्रमुख यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. शिवसेना ह्या कामासाठी सतत पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केली.

Exit mobile version