Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेमडेसीविर कमीतकमी दरात विकावे – पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे (व्हिडीओ)

बुलडाणा प्रतिनिधी । कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणारे रेमडेसीविर इंजेक्शन आता जिल्ह्यामध्ये 1 हजार 110 ते 1 हजार 400 रुपयांपर्यंत रुग्णांना मिळणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून अनेक रुग्णांना रेमडेसीविर इंजेक्शन घ्यावी लागत आहे. परंतु काही औषधी दुकानदार रेमडेसीविर इंजेक्शनची खरेदी किमंत कमी झालेली असतांना देखील एमआरपी दराने हे इंजेक्शन विकून एकप्रकारे ग्राहकांची आर्थिक लूट करत असल्याची बाब अन्न औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या निर्दशनास आले. दर कमी कसे होतील यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून रेमडेसीविर खरेदी किमतीवर फक्त 10 टक्केच मार्जिन घेऊन त्याची ग्राहकांना विक्री करावी असे आवाहन केले.

या आवाहनाला प्रतिसाद देत औषधी दुकानदारांनी देखील जिल्ह्यामध्ये 1110 रु ते 1400 रु पर्यंत रेमडेसीविर इंजेक्शन ग्राहकांना विक्री करण्याची तयारी दर्शविली असून आता जिल्ह्यात 1110 रु ते 1400 रुपायातच रेमडेसीविर इंजेक्शन मिळणार आहे. तसेच लवकरच सदर कंपनीशी चर्चा करून सर्व विक्रेत्यांना एकाच दरात इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात येणार आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सर्व रुग्णांना हे इंजेक्शन फक्त 1 हजार 110 रुपयात मिळणार असून एकप्रकारे त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी एस राममूर्ती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, अन्न व औषध प्रशासन विभागाचे श्री बर्डे, श्री गिरके व बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Exit mobile version