Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा येथे विधवा सुनेचा पुनर्विवाह ; समाजासमोर आदर्श

चोपडा प्रतिनिधी । सासरच्या मंडळीनीच सुनेचा पुनर्विवाह करून समाजात आदर्श विवाह घालून दिला आहे. मुलाचे निधन झाल्यानंतर त्यांनी सून रिनाला मुलगी मानले आणि तिचा पुनर्विवाह करून दिला.

पुनर्विवाह व्हावे अशी सर्वांची इच्छा असते. परंतु पुढाकार कोणी घेत नाही. आजची सामाजिक परिस्थिती बिकट झाली आहे. मुलीचे प्रमाण कमी असले तरी चांगल्या वधुसाठी चांगला वर मिळणे कठीण झाले आहे तर चांगल्या वरासाठी उत्तम वधू मिळणे फारच कठीण झाले आहे. अश्या परिस्थितीत जो तडजोड करेल त्याचेच विवाह जुळतील असं अलिखित नियम होऊन गेले आहे. असाच एक आदर्श विवाह चोपड्या शहरात पाहायला मिळाले तालुक्यातील विरवाडा येथील व चोपडा शहरातील लव्हली ट्रेलरचे संचालक स्व.सचिन हरकचंद सुराणा याचे जवळपास 3 वर्षापूर्वी अल्पश्या आजाराने दुःखद निधन झाले. त्याची धर्मपत्नी रिना नेमीचंद जैन घोडगाव ता चोपडा येथील होती कमी वयातच ती विधवा झाली होती. संपुर्ण आयुष्य कसे निघणार ? या विवेचनात सासर व माहेरची मंडळी होती. रिनाची सासू श्रीमिती लिलाबाई सुराणा ह्याही अगदीं कमी वयातच विधवा झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी जीवन जगताना पती विना पत्नीला काय यातना भोगावे लागतात हे लिलाबाई ने जवळून पाहिले होते. त्यामुळे चांगला मुलगा मिळाला तर मी माझ्या सुनेचे लग्न लावून देईल असे ते नेहमी सांगत होते. त्याची मनातील इच्छा त्यांनी त्याचे जेठ ताराचंद सुराणा, मोठा मुलगा संदिप सुराणा, भाऊ जवरीलाल कटारिया यांना सांगितली. त्यानुसार त्यांनी मुलगा शोधण्याचे काम केले. मोहाडी जि धुळे येथील स्व.लखीचंद नेमीचंद छाजेड यांचा मुलगा चि.पुनमचंद छाजेड ह्याला पसंद केले. त्या मुलाला देखील मुलगी पसंद आली आणि दि २७ /१२/२० रोजी सकाळी १ वाजता श्री स्वामीं समर्थ पेलेसमध्ये आदेश बरडीया यांनी जैन पध्दतीने हे लग्न लावले  सासुनेच मुलगी समजून सुनेचे पुनर्विवाह करून दिल्याने उपस्थित मंडळी विशेष कौतुक करत होते. 

यावेळी आशिर्वाद देण्यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, चोपडा पिपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, संचालक नेमीचंद कोचर, संघपती गुलाबचंद देसरडा, पत्रकार लतीश जैन वधूचे मोठे वडील अशोक सांडेचा, दिलिप सांडेचा, घोडगावचे माजी सरपंच प्रकाश पाटील, तर वर पक्षाकडून पारसमल छाजेड, अशोकचंद छाजेड, हे उपस्थित होते. तर लग्न जमविण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश छाजेड , सतिश छाजेड, सुनिल छाजेड, तर वधूपक्षा कडून नेमीचंद सांडेचा, जवरीलाल कटारिया, राजेंद्र सुराणा, संदीप सुराणा यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.ए.पाठक सर यांनी केले.

 

Exit mobile version