Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेमंड कंपनीसमोरून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील रेमंड कंपनीच्या समोर पार्किंग करून लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनिल पंडीत ठाकूर (वय-३८) रा. रथचौक, कोळीपेठ जळगाव हा तरूण एमआयडीसीतील रेमंड कंपनीत नोकरीला आहे. नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. १८ मे रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता कंपनीत दुचाकी (एमएच १९ सीडी ००७३) ने कामाला गेला. दुचाकी कंपनीच्या समोर असलेल्या मोकळ्या ठिकाणी पार्कींग करून लावली होती. दुपारी ३ वाजता कामावरून सुटी झाल्याने ते घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ आला. त्याला दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्याचा परिसरात सर्वत्र शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. सोमवारी २३ मे रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.

Exit mobile version