Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवकाशातून पडलेले ‘त्या’ यंत्राचे अवशेष सापडले !

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही उल्कापात सदृष्य आगीचे लोंढे आकाशातून पडतांना गुढीपाडव्याच्या रात्री अनेकांनी पाहिले. याचे व्हिडीओ देखील कॅमेऱ्यात कैद होवून सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हा सर्वांसाठी कुतूहलाचा विषय होता. सर्वांना याची उत्सूकता लागून होती. अखेर या यंत्राचे अवशेष वर्धा जिल्ह्यातील एका शेतात आढळून आले आहे.

 

आकाशात दिसल्या तेज शलाका

जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी उल्का पडल्यासारख्या तेज शलाकाचं दृश्य पाहायला मिळालं त्यामुळे ते नेमकं उल्का पिंड आहे की सॅटॅलाइटचे तुकडे होऊन तो विखुरला आहे. यासंदर्भात खगोलप्रेमींसह नागरिकांमध्ये चर्चा होऊ लागली होती. असे असतांनाच रविवारी ३ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वाघेडा आणि धामणगाव येथे अवकाशातून पडलेले यंत्र अवशेष आढळून आले आहे. शेतकरी नितीन सोरते हे आज सकाळी आपल्या शेतात गेले असता त्यांना एक सिलेंडर सारखी आकृती असणारी काळ्या रंगाच्या धाग्याने गुंडाळलेली वस्तू अंदाजे ३ ते ४ किलो वजनाची आढळून आली. त्यांनी तातडीने समुद्रपूर पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक राम खोत याच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेवून अवशेष ताब्यात घेतले आहे. रात्री आकाशात दिसणारे प्रकार त्यांनतर जमिनीवर पडलेले हे अवशेष हा काय प्रकार आहे. हाच संभ्रम नागरिकांमध्ये अजूनही कायम आहे.

Exit mobile version