Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव येथे रयत सेनेतर्फे पूरग्रस्तांना मदत

chalisgaon madat

चाळीसगाव, प्रतिनिधी | कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्त बांधवांना मदत व्हावी, या हेतूने येथील माजी आमदार राजीवदादा देशमुख यांनी स्वतः मदत देऊन नागरिकांनीही मदत करावी, असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी पूरग्रस्तांना स्वखर्चाने एक गोणी हळद व एक गोणी मिरची पावडर अशी मदत देऊन सदर वस्तू राजपूत मंगल कार्यालयात श्री. देशमुख यांच्याकडे सुपर्द केल्या आहेत.

 

याप्रसंगी जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, रयत सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष संतोष निकुंभ, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, दिनेश चव्हाण, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, विलास मराठे, शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे, किशोर शेळके अमोल देठे, आदी उपस्थित होते.

Exit mobile version