Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रिलायन्स कंपनीच्या बाजार मूल्यात ६० हजार टक्क्यांनी वाढ

MukeshAmbani k9sG 621x414@LiveMint

मुंबई वृत्तसंस्था । रिलायन्स इंडस्ट्रीच्या मार्केट कंपनीने गुरुवारी १० लाख कोटी रूपयांचा टप्पा पार केला असून गेल्या ३० वर्षांमध्ये कंपनीच्या बाजार मूल्यात ६० हजार ७४२ टक्क्यांची वाढ झाली आहे. यादरम्यान कंपनीनं मोठी प्रगतीही केली आहे. एस.अँड.पी आणि मूडीजने रेटिंग दिलेली ही खासगी क्षेत्रातील पहिली कंपनी आहे.

कंपनीच्या वाटचालीवर गुंतवणुकदारांनी विश्वास ठेवला असून कंपनीला त्यांच्याकडून कायम समर्थनही मिळत असल्याचे म्हटलं जाते. म्हणूनच जानेवारी १९९१ पासून कंपनीच्या बाजार मूल्यात ६० हजार ७४२ टक्क्यांची वाढ झाली आहे. यादरम्यान कंपनीने इतका मोठा पल्ला गाठला आहे की ती आता १५० देशांच्या जीडीपीपेक्षाही कंपनी मोठी झाली आहे. एस.अँड.पी आणि मूडीजने रेटिंग दिलेली ही खासगी क्षेत्रातील पहिली कंपनी आहे. २०१९ च्या आर्थिक वर्षाच्या तिमाहित रिलायन्सनं १० हजार कोटी रूपयांचा नफा कमावला होता. २ जानेवारी १९९१ ते २९ नोव्हेंबर २०१९ दरम्यान रिलायन्सच्या मार्केट कॅपमध्ये ६०० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे एल अँड टी, अशोक लेलँड, टाटा स्टील, सिअॅट यांसारख्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १५ ते २०५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Exit mobile version