Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुख्यमंत्रिपदी पुन्हा फडणवीस नकोत; ट्विटरवर ट्रेण्ड

devendra fadnavis cm 696x348

 

मुंबई (वृत्तसंस्था) ट्विटरवर #RejectFadnavisForCM आणि #RejectFadnavisAsCM हे दोन हॅशटॅग्ज प्रचंड ट्रेण्ड होत आहेत. या हॅशटॅग्जच्या माध्यमातून ट्विटरकर शेतकरी आत्महत्या, आरेमधील वृक्षतोड, बेरोजगारी, कोल्हापूर-सांगलीतील पूर अशा विविध मुद्द्यांवरून फडणवीसांच्या कामगिरीवर नाखूश असल्याचे दिसून येत आहे.

 

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १२ दिवस उलटून गेले असतानाही सत्ता स्थानपनेची कोणतीही चिन्ह दिसत नसल्याने आता भाजपमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. त्यात ट्विटरवर सोमवारपासून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी पुन्हा नकोत अशी मागणी मोठ्या प्रमाणावर ट्विटरकर करताना दिसत आहेत. राज्यासमोर उभे ठाकलेले सर्व प्रश्न आणि समस्यांना फडणवीस जबाबदार असल्याचे ट्विटरकरांचे म्हणणे आहे. इतकेचं नव्हे, तर शिवसेनेने भाजपसोबतची युती संपुष्टात आणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन करावे असाही सल्ला ट्विटरकर मोठ्या प्रमाणावर देत आहेत.

Exit mobile version