Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर येथे जुगार अड्डयावर धाड; पाच अटकेत

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूरपेठ येथील बडा मोहल्ला परिसरात सुरू असणार्‍या एका जुगार अड्डयावर एलसीबीच्या पथकाने धाड टाकून पाच जणांना अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, पहूरपेठच्या बडा मोहल्ला परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. यानुसार, उपनिरिक्षक सुधाकर लहारे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, हवालदार वैशाली महाजन, प्रमोद लाडवंजारी, विजय पाटील, सचिन महाजन, भागवत पाटील, नंदलाल पाटील आणि चालक युवराज पाटील यांच्या पथकाने संबंधीत जुगार अड्डावर धाड टाकली. तेथे पाच जण जुगार खेळत असल्याचे दिसून आले. या अनुषंगाने एलसीबीच्या पथकाने इमरामोद्दीन समशेद्दीन शेख (वय५८); शाहिस्तेखान रहीमखान पठाण (वय ४६); रसूलखान रहीमखान पठाण ( वय ५०); इकबाल शेख लतीफ शेख (वय ३२) आणि सैयद अमीर सैयद गुलाब (वय ५२) सर्व राहणार बडामोहल्ला, पहूरपेठ यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून जुगाराची सामग्री आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. येथे तलवारदेखील आढळून आली असून कारवाई होत असतांना पथकातील एका सदस्याला धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तथापि, पोलीस पथकाने असे काहीही झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Exit mobile version