Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग न्यूज : आर.एल. समूहावर ईडीची धाड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अतिशय ख्यातनाम अशी सराफा पेढी म्हणून ख्यात असणार्‍या राजमल लखीचंद अर्थात आर. एल. ग्रुपवर आज ईडीची धाड पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

राजमल लखीचंद अर्थात आर.एल. समूहाच्या जळगावच्या सराफ बाजारातील पेढीवर आज सकाळी आठ वाजेपासून सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीच्या पथकाने छापा टाकून तपासणी करण्यास प्रारंभ केल्याचे वृत्त आहे. या ग्रुपच्या पेढीसमोर पथकाची चारचाकी वाहने लागली असून अद्याप तरी कुणी याबाबत अधिकृतपणे माहिती दिलेली नाही.

लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीने येथे भेट दिली असता पथक गाड्या बाहेर लाऊन आतमध्ये तपासणी करत असल्याचे दिसून आले. या फर्मचे सर्व दरवाजे बंद करून आतमध्ये तपासणी होत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे.

Exit mobile version