Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ येथील विस्थापितांचे पुनर्वसन लवकरात लवकर करा ; राष्ट्रीय दलित पँथरची मागणी (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 11 15 at 8.46.42 PM

भुसावळ, प्रतिनिधी | राष्ट्रीय दलित पँथरतर्फे एक दिवशीय धरणे आंदोलन करुन उप विभागीय अधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले असून विस्तापितांचे लवकरात लवकर पुनर्वसन कण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे

निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्या पुढील प्रमाणे, भुसावळ नगर परिषद हद्दीतील घरांचे अतिक्रमण रेल्वे ने दिनांक १५ ते १८ नोव्हेंबर २०१८ पर्यंत विशेष मोहिम राबवून काढण्यात आलेले आहेत. आज शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी या घटनेला १ वर्ष पूर्ण झालेले आहे. भिमवाडी वार्ड, सोमनाथ मंदिरा समोरील हद्दीवाली चाळ (उपाली नगर), आगवाली चाळ (सिध्दार्थ नगर), आर.पी.एफ बॅरक, अशोक नगर,चाळीस बंगला बुध्द विहार, चांदमारी चाळ, न्युपोटर चाळ, १५ बंगला, भारत नगर, व इतर वार्डच्या रहीवाश्यांना विस्तापित केले आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या – भुसावळ नगर परिषद हद्दीतील ५००० विस्तापीत झालेल्या रहिवाश्यांचे पुर्नवसन करण्यासाठी भुसावळ नगर परिषदने भुसावळ येथील शासकीय जमीन सर्वे क्रमांक ६३/१(१९.०० हेक्टर) या जागेवरती पंतप्रधान आवस योजने अंतर्गत या योजनेत प्रत्येक विस्तापित झालेल्या कुटूंबाचे पुर्नवसन लवकरात लवकर करावे. या योजनेत पुर्नवसन करतांना सर्व प्रथम प्राधान्य या विस्तापित झालेल्या प्रत्येक वार्डाच्याकुटूंबाला दयावे. या योजनेत प्रत्येक कुटूंबाला ५०० स्के. फुट जागेवरती पंतप्रधान आवास योजनेत घर बांधुन देवून प्रत्येक कुटूंब प्रमुखाच्या नावे ७/१२ उतारा करुन दयावा. यावेळी कोणतेच कुटूंब विस्तापित राहता कामा नये. विस्तापित झालेल्या रहिवाश्यांना वाटप करतांना त्यामध्ये कोणत्या ही प्रकारची लॉटरी सोडत काढून वाटप करु नये. तसेच नगरसेवक, आमदार, पुढारी या लोकांची वशिलेबाजी खपवून घेवू नये. अत्यंत पारर्देशक पध्दतीने घराचे वाटप करावे. यावेळी पी आरपी चे नेते जगन सोनवणे उपस्थित होते. निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष विजय बाबुराव साळवे , जिल्हानेते विशालभाऊ विष्णु सोयंके, जिल्हा सरचिटणीस प्रेमचंद सुरवाडे , जिल्हा उपाध्यक्ष कैलास पारधी , जिल्हाकोषाध्यक्ष संजय लोखंडे , जिल्हा उपसचिव अनिल गंगावणे , जिल्हा संघटक गोविंद सोनवणे,  जिल्हा उपाध्यक्ष गोकुल अहिरे, भुसावळ ता.संघटक बाळु मगर, भुसावळ शहर युवा अध्यक्ष अल्पेश मोरे, ,भुसावळ शहर अध्यक्ष राजु तायडे आदी उपस्थित होते.

Exit mobile version