Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करा, अन्यथा उपोषण – आ. पाटीलांचा इशारा

मुक्ताईनगर । मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करा. अन्यथा पुरवठा सुरळीत न झाल्यास आ. चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात (दि. 2 मे) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू, असा इशारा निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांना दिला आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, दि. 29 एप्रिल 2021 रोजी मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचा उपचार करीत असताना ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे रुग्णांना गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे हलविण्यात आले आज रोजी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय हे सर्व सोयींनी युक्त असे एकमेव रुग्णालय असून ऑक्सिजनचा साठा करून ठेवण्यासाठी ड्युरा सिलेंडर  आहेत परंतु जिल्हा प्रशासनामार्फत ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे येथे रुग्ण दगावण्याची शक्यता वाढलेली आहे तरी उद्या दिनांक 1मे 2021 पर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित न झाल्यास  याबद्दल तशी शाश्वती न मिळाल्यास  मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात दिनांक 2 मे 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिलेला आहे.

 

Exit mobile version