Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात शिवसेनेच्या सदस्य नोंदणीस प्रारंभ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते आज शिवसेनेच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला.

 

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळी शहरातील शिवतीर्थ मैदान परिसरात महा सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. त्यांनी स्वत: याप्रसंगी अर्ज भरून घेतले. जळगाव जिल्ह्यातून एकूण एक लाख शिवसैनिकांची नवीन नोंदणी करण्यात येणार या नोंदणीची सुरुवात जळगाव शहरातून करण्यात आली  असल्याचा दावा जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे

 

 

शिवसेनेतून शिंदे गट निर्माण झाल्यानंतर शिंदे गटाची स्वतंत्र कार्य करणे जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच स्थानिक पातळीवर संघटना अधिक मजबूत व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटना बांधणीवर अधिक जोर दिल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकांसाठी संघटना अधिक बळकट व्हावी या उद्देशाने सदस्य नोंदणी अभियान करण्यात येणारं असल्याची माहिती जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांनी दिली आहे.

 

या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उपजिल्हाप्रमुख स्वप्निल परदेशी  युवा सेन शिवसेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील महिला महानगराध्यक्ष ज्योती शिवदे  राहुल नेथलेकर,  सोहम विसपुते,  सागर हिरवाळे,  गिरीश सपकाळे,  हितेश ठाकरे  संदीप सुरडकर,  पुष्पक सूर्यवंशी,  भारती  रंधे,  हर्षल मावळे,  शंतनू नारखेडे,  जितेंद्र पाटील, सावखेडा सरपंच सुनील आगेवाल,  केतन पोळ,  सागर सैंदाणे आदींसह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version