Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्यात भरड धान्य खरेदीच्या नाव नोंदणीस प्रारंभ

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत( खरीप ) हंगाम भरडधान्य( ज्वारी,मका,)खरेदी साठी नोंदणीस सुरुवात झाली आहे.

सन २०२३-२४ वर्षाच्या हंगामात केंद्र शासना कडुन किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत ( खरीप) हंगाम भरडधान्य ( ज्वारी , मका ) खरेदी केंन्द्र यावल , उपअभिकर्ता संस्था म्हणून दिनांक १३ रोजीच्या जिल्हा पणन अधिकारी याचेकडुन पाप्त ईमेल संदेशानुसार तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मार्फत नोंदणी सुरू झालेली आहे .

शासकीय हमीभाव ज्वारी :-३१८० मका :-२०९० प्रति क्विंटल प्रमाणे असुन .शेतकर्‍यांनी नाव नोंदणी साठी आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स, पिकाचा ऑनलाईन चालु २०२३-२०२४खरीप हंगामाचा (ज्वारी / मका ) या पिकाचा पेरा नोंदविलेला ७/१२ उतारा तलाठी यांची स्वाक्षरी असलेला . ऑनलाईन नोंदणीकरीता शेतकरर्‍याचा प्रत्यक्ष ङखतए फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.त्याशिवाय नोंदणी पुर्ण होत नाही. नोंदणी साठी त्वरीत संस्थेशी संपर्क करावा.

शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे , त्यामुळे बँक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी ,तसेच बॅक अकाऊंट चालू स्तीतीत तसेच पुर्ण अकी असावे अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्या मध्ये रक्कम वर्ग होऊ शकते. दरम्यान, नोंदणीची अंतीम दिनांक ३१ डिसेंबर पर्यंत आहे. तर, नोंदणी ठिकाण कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड कोरपावली तालुका यावल.जिल्हा जळगाव असे आवाहन विकाचे चेअरमन राकेश फेगडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version