Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरडधान्यासह गहू खरेदीसाठी नाव नोंदणीस सुरुवात

यावल प्रतिनिधी । तालुक्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत (रब्बी) २०२०/२०२१ वर्षाच्या हंगामात केंद्र शासनाकडुन किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत ( रब्बी) भरडधान्य (ज्वारी, मका) व गहू खरेदी केंद्र यावल, उपअभिकर्ता संस्था म्हणून तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मार्फत (रब्बी) भरडधान्य व गहू खरेदीसाठी नावनोंदणी (दि.५) उद्या सोमवारपासून सुरू होणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन कोरपावली विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातुन करण्यात आले आहे.

शासकीय हमीभाव ज्वारी :-२६२० ₹
मका :-१८५० ₹ गहू :- १९७५ ₹ प्रति क्विंटल प्रमाणे आहे.

शेतकऱ्यांनी नाव नोंदणी साठी आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स, पिकाचा ऑनलाईन चालु रब्बी हंगामाचा (ज्वारी / मका/ गहू ) या पिकाचा पेरा नोंदविलेला ७/१२ उतारा तलाठी यांची स्वाक्षरी असलेला घेऊन संस्थेशी संपर्क करावा.
शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे , त्यामुळे बँक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी ,तसेच बॅक अकाऊंट चालू स्तीतीत असावे अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते.

नोंदणी ठीकाण कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.कोरपावली तालुका यावल जिल्हा जळगाव असे असून तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या रब्बीच्या धान्याची नोंद करावी असे आवाहन राकेश वसंत फेगडे यांनी केले आहे.

Exit mobile version