Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंजूर निधी खर्चाबाबत आ. अनिल पाटलांच्या निवासस्थानी बैठक

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी पाडळसे धरणाचे काम जलदगतीने पूर्ण करणे व मंजूर निधी खर्चाबाबत सविस्तर बैठक घेण्यात आली.

धरणाच्या भरीव निधी साठी मंत्रालय स्तरावर आ.अनिल पाटील यांच्यासोबत जन आंदोलन समितीचे पदाधिकारी संबंधितांची भेट घेतील.  पाडळसे धरण जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी यांचेसह प्रमुख पदाधिकारी यांनी आ.अनिल पाटील यांचे निवासस्थानी धरणाच्या प्रगतीबाबत चर्चा केली.यावेळी आ.अनिल पाटील यांनी सांगितले की, येत्या ३ वर्षात  धरणाचे केवळ बांधकाम राज्यशासनाच्या निधीतून पूर्ण करून घ्यायच्या प्रयत्नांत आहे.जमिन अधिग्रहण व पाणी लिफ्ट करणेसह इतर कामासाठी लागणाऱ्या निधीची केंद्र सरकारने मदत करणे अपेक्षित आहे.

मात्र मागिल अर्थसंकल्पात मंजूर निधी प्रशासनाने १००% खर्च करणे अपेक्षित असतांनाही तो झालेला नसल्याने कामाची गती वाढविण्यासाठी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना बोललो असल्याचे सांगितले.आपण अनेक तांत्रिक अडचणींवर मात करून काम पुढे नेत असून राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून घेणेकामी लवकरच जनआंदोलन समितीच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन मुंबई मंत्रालय येथे संबंधित विभागाला भेट देणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले. समितीचे प्रा.शिवाजीराव पाटील यांनी बैठकीचे प्रास्ताविक करतांना धरणाबाबत राज्यशासनाच्या पातळीवर सुरू असलेल्या निधींविषयक तरतुदीं व खर्चाबाबत, प्रशासनाच्या पातळीवर प्रलंबित कामाबाबत यावेळी समितीच्या वतीने विचारणा केली.

याअनुषंगाने झालेल्या चर्चेत समितीचे सुभाष चौधरी, अजयसिंग पाटील, रविंद्र पाटील, महेश पाटील, देविदास देसले, प्रशांत भदाणे यांनी सहभाग घेतला. धरणाच्या कामाला गतीसह निधीची उपलब्धता करून देत पुढील टप्प्यातील कामासाठी प्रयत्न करीत असल्याबद्दल जनआंदोलन समितीच्यावतीने आ.अनिल पाटील यांचे आभार सामजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी मानले.

सदर बैठकीत नगराध्यक्ष विनोद पाटील, सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, श्रावण पाटील, रामराव पवार, पुरुषोत्तम शेटे, नरेंद्र पाटील, योगेश पाटील, गिरीश पाटील, आर.बी. पाटील, सुनिल पवार, रियाज मौलाना, ऍड.रझाक शेख, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.डी. देशमुख, एस. बी. बैसाणे, सेवानिवृत्त वन अधिकारी एस.आर. पाटील, गजेंद्र पाटील, हरिष बिऱ्हाडे, प्रविण संदानशिव, अलीम मुजावर, सेवानिवृत्त कृषिअधिकारी यशवंत बोरसे, सचिन बेहरे, सुनिल शिसोदे यांचेसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version