Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साखर, साबण, मिठाई, खाद्य तेल, अगरबत्तीवरील जीएसटी करात कपात

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकारने साखर, मिठाई, राईचा सॉस, केचअप, साबण, दंतमंजन, मिनरल वॉटर, अगरबत्ती, खाद्य तेल, दुग्धजन्य पदार्थ, हेअर ऑइल, १००० रुपयांपर्यंतचे फुटवेअर, रंग या वस्तूंच्या जीएसटी दरात कपात केली आहे.

देशात १ जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू करण्यात आला. ही कर प्रणाली लागू झाल्यापासून सातत्याने जीएसटी दर कमी करण्यात आला असल्याचे सरकारने म्हटलं आहे. आता केवळ लक्झुरी वस्तूंसाठी २८ टक्के जीएसटी आहे. एकूण २३० वस्तूंपैकी २०० वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला असल्याचे अर्थ खात्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

याशिवाय जीएसटी लागू झाल्यानंतर जीएसटी करदात्यांच्या संख्या दुप्पट झाली आहे. सध्या १ कोटी २४ लाख जीएसटी करदाते आहेत. संपूर्ण जीएसटी प्रक्रिया आता स्वयंचलित झाली असल्याचा दावा अर्थ खात्याने केला आहे. आतापर्यंत जीएसटी प्रणालीत ५० कोटी कर परतावे देण्यात आले. गृहनिर्माण क्षेत्रासाठी ५ टक्के जीएसटी असून परवडणाऱ्या घरांसाठी तो केवळ १ टक्का आहे.

Exit mobile version