Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केंद्रीय यंत्रणांच्या नावावर वसुलीचे रॅकेट : शेलार यांना शंका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून राज्यात वसुलीचे रॅकेट सुरू असल्याची शंका आज भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत व्यक्त केली आहे.

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केंद्रीय यंत्रणांच्या नावाखाली राज्यात प्रशासकीय यंत्रणा वसुलीचं षडयंत्र रचत असल्याचा धक्कादायक आरोप विधानसभेत केला आहे. शेलार विधानसभेत म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांच्या नावाने वसूलीचे षडयंत्र राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत रचले जात तर नाही ना? अशी शंका सौरभ त्रिपाठी यांचे प्रकरण उघड झाल्यामुळे  उपस्थित होते आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

राज्याच्या पोलीस दलातील सौरभ त्रिपाठी हे आयपीएस अधिकारी आंगडीया या व्यापार्‍यांकडून आयकर अधिकारी असल्याचे भासवून वसूली करीत असल्याचे उघड झालं. त्यानंतर राज्य शासनाने सौरभ त्रिपाठी यांना निलबित केले. या कारवाईचे स्वागत करत शेलारांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणानंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अशा प्रकारे केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा वापर करुन वसूली तर करीत नाही ना? केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचे षडयंत्र तर राज्यातील प्रशसकीय यंत्रणेमध्ये शिजत तर नाही ना? त्रिपाठीसारखे अन्य कोणी अधिकारी वसूली तर करीत नाही ना? अशी शंका उपस्थित केली.  असे असेल तर महाराष्ट्राची  आणि देशाची बदनामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गंभीर बाब असून याप्रकरणी तातडीने शासनाने दखल देऊन आवश्यकता असल्यास चौकशी करावी, अशी मागणी आमदार ड आशिष शेलार यांनी केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याची शासन दखल घेत असून चौकशी केली जाईल अशी घोषणा केली.

Exit mobile version