Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अरे देवा…जिल्ह्यात एकाच दिवसात ८७० कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ८७० आढळून आले आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच आठशे पेक्षा जास्त रूग्ण आढळून आले असून यात आजची संख्या उच्चांकी आहे. यात जळगाव शहरातील सर्वाधीक रूग्ण असल्याचे आढळून आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ८७० कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक २२२ रूग्ण हे जळगाव शहरातील आढळून आले आहेत. याच्या खालोखाल अनेक तालुक्यांमधील रूग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.

संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-२२२; जळगाव ग्रामीण-७२; भुसावळ-१०; अमळनेर-४४; चोपडा-८४; पाचोरा-१४; भडगाव-४०; धरणगाव-७१; यावल-२५; एरंडोल-५३; जामनेर-३७; रावेर-८६; पारोळा-३७; चाळीसगाव-६५; मुक्ताईनगर-३; बोदवड-५ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ० असे रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या २१०९७ इतकी झालेली आहे. यातील १४५४३ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ५६६ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज १३ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ७१३ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ५८४१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews

Exit mobile version