मुंबई प्रतिनिधी । सरन्यायाधीश रंजन गोगोई हे येत्या १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असून यानंतर वरिष्ठ न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे अर्थात एस. ए. बोबडे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्यात यावी, अशी शिफारस विधी आणि न्याय मंत्रालयाला पत्राव्दारे गोगोई यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ न्यायाधीश असलेल्या रंजन गोगोई यांनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी देशाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून थपथ घेतली होती. आता ते १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे परंपरेनुसार आपला उत्तराधिकारी म्हणून आपल्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ असलेल्या न्यायाधीश एस. ए. बोबडे यांची शिफारस त्यांनी सरन्यायाधीश पदासाठी केली आहे.
कोण आहेत न्या. एस. ए. बोबडे ?
न्या. शरद अरविंद बोबडे यांचा जन्म नागपूरमध्ये २४ एप्रिल १९५६ रोजी झाला. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपली प्रॅक्टिस सुरु केली. १९७८मध्ये ते महाराष्ट्र बार काऊन्सिलमध्ये दाखल झाले. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात ते काम करीत होते. मुंबई हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांनी सन २००० मध्ये नियुक्त झाली. मधल्या काळात मध्य प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश त्यानंतर २०१३मध्ये सुप्रीम कोर्टात ते न्यायाधीश झाले.