Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डांभूर्णी येथील विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

डांभूर्णी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील डॉ. डी.के.सी. विद्यालयात दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा डॉ. सुपे ग्लोबल ॲकडमीच्या वतीने सत्कार करण्यात आले.

 

या कार्यक्रमात विपुल फालक सर यांच्याहस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला. विपुल फालक याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत म्हणून त्यांनी प्रथम आलेली विद्यार्थी निकिता विनोद कोळी यास अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेच्या क्लासेससाठी डॉ. सुपे ग्लोबल अकॅडमीमध्ये  लागणारी  १ लाख ११ हजार रूपयांची संपूर्ण फी माफ केली आहे. तसेच द्वितीय आणि तृतीय आलेले विद्यार्थी अनुक्रमे मनोज सुनील झूरकाळे (द्वितीय), माहेश्वरी मनोज नेवे (तृतीय),हितेश समाधान पाटील (तृतीय) यांना सुध्दा अल्पशः फीस मध्ये प्रवेश देण्याचे आश्वासन दिले.

 

याप्रसंगी मुख्याध्यापक उमाकांत महाजन, रवींद्र निळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास कुमार पाटील यांनी आभार मानून मनोगत व्यक्त केले. विपुल फालक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणतीही गुणपत्रिका विद्यार्थ्याचे भविष्य निश्चित करत नाही आणि जीवनात यशस्वी बनण्यासाठी उत्तम बना, श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न करू नका. स्पर्धा स्वतः सोबत करा. तसेच डॉ. सुपे ग्लोबल अकॅडमीचे संचालक डॉ.सुपे  हे नेहमीच विद्यार्थ्याच्या मदतीसाठी नेहमी कार्यरत असतात हे ही सांगितले.

 

Exit mobile version