Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पत्रकार संस्था फैजपूर तर्फे सत्कार समारंभ

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांवर आधारित, पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या फैजपूर या पत्रकार संघटनेतर्फे ईद मिलन (शिरखुर्मा) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पत्रकार संस्था कार्यालय, मौलाना अबुल कलाम आझाद व्यापारी संकुल आठवडे बाजार फैजपूर येथे आयोजित या कार्यक्रमात फैजपूर विभागीय पोलिस उपअधीक्ष डॉ.कुणाल सोनवणे यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस महासंचालक पदक घोषित करण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार पत्रकार संस्थाचे अध्यक्ष फारुख शेख अमीर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मसाका संचालक नरेंद्र नारखेडे यांची सहकार भारती जिल्हा उपाध्यक्षपदी व खान्देश सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पत्रकार नंदकिशोर अग्रवाल यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

या छोट्या खानी कार्यक्रमला उप विभागीय पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे नरेंद्र भाऊ नारखेडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम चे सुत्रसंचलन व आभार लेंफ.आर आर राजपूत सर यांनी केले या कार्यक्रमात जमाते इस्लामी हिंदचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अ.रहुफ जनाब, स पो नि. सिद्धेश्वर आखेगावकर, फैजपूर मुख्याअधिकारी वैभव लोंढे, पिएसआए मोहन लोखंडे, जेष्ठ पत्रकार अरुन होले, ललीत फिरके, माजी नगरसेवक कलीमखान मण्यार जाफर शेख, सामाजिक कार्यकर्ते सय्यद कॉसर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष अनवर खाटीक, काँग्रेस शहर अध्यक्ष रियाज शेख, न्हावी ग्राम प. जेष्ठ सदस्य अरुण तायडे, खान्देशनारी शक्ती अध्यक्षा दिपाली झोपे, संगिता चौधरी, साजिद शेख, वसीम जनाब मुदससर नजर डॉ. दानिश  नासीर शेख, कौसर सईद ऐजास, ऊर्दू शिक्षक सेनेचे मो.ईलयास, गुरव सर, प्रहार जनशक्ती पार्टीचे सचीन कोळी, आसीफ शेख, रामराव मोरे, जी शाकीर शेख, इमाम अख्तर, पहेलवान विलास ताठे, पत्रकार वासुदेव सरोदे, निलेश पाटील, नंदकुमार अग्रवाल, साजीद शेख समीर तडवी, योगेश सोनवणे, मुबारक तडवी, रंजित भालेराव, शब्बीर रवान, शाकीर मलिक जावीद काजी, देवेंद्र झोपे तसेच फैजपूर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हमीद शेख मोहसीन शेख युनुस मोयनोददीन शेख यांनी परिश्रम केले.

Exit mobile version