Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्राहकांना दिलासा ; व्होडाफोन-एअरटेल फ्री कॉलिंग

Airtel Vodafones

नवी दिल्ली वृत्तसंस्था । व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलचे ग्राहक आता इतर नेटवर्कच्या मोबाइल नेटवर्कवर अमर्यादित विनामुल्य कॉल करु शकतील. व्होडाफोन आणि एअरटेलने त्यांच्या वेगवेगळ्या कालावधीतील योजनांसाठी इतर नेटवर्क कॉलिंगसाठी एक हजार, तीन हजार, १२ हजार मिनिटांसाठी विनामूल्य कॉलिंगची ऑफर दिली. तथापि, जर ग्राहकांनी ही मर्यादा ओलांडली तर त्याला प्रति मिनिट सहा पैसे द्यावे लागतील. रविवारी कंपन्यांनी शुल्क मागे घेत असल्याचेही जाहीर केले.

दि.३ डिसेंबरपासून लागू केलेल्या सुधारित दरपत्रकांनंतर या कंपन्यांनी ही सुविधा देऊ केली आहे. आतापर्यंत अन्य नेटवर्कच्या मोबाइल क्रमांकावर कॉल केल्यास दोन्ही कंपन्यांकडून आययूसीपोटी (इंटरकनेक्ट युजेस चार्जेस) प्रति मिनिट सहा पैसे आकारले जात होते. व्होडाफोन, एअरटेल व जिओ या टेलिकॉम कंपन्यांमध्ये आययूसीवरून वाद झाल्यानंतर सर्व कंपन्यांनी ग्राहकांकडून अन्य नेटवर्कवरील कॉलसाठी प्रति मिनिट सहा पैसे आकारण्यास सुरुवात केली होती. भारती एअरटेलने आपल्या कंपनीसंबंधीची ही माहिती ट्वीटरवरून प्रसिद्ध केली.

Exit mobile version