Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कॉंग्रेसच्या कामांचा लेखा जोखा जनतेपर्यंत पोहचवा ;  विनायकराव देशमुख

WhatsApp Image 2019 09 09 at 7.19.44 PM

फैजपूर, प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणूक विचारांची निवडणूक नाही निवडून येण्यासाठी सत्ताधारी कुठल्याही स्थरावर उतरले आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी काँग्रेसने ६० वर्षात केलेल्या कार्याचा लेखा जोखा जनतेपर्यंत पोहचवावा असे आवाहन  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव व जळगाव जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख यांनी केले

आज फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात आयोजित यावल-रावेर विधानसभाचे सेक्टर इनचार्ज शिबिरात ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी विनायकराव देशमुख मार्गदर्शन करतांना म्हणाले, ७० वर्षात काँग्रेस काय केले ? असा प्रश्न करतात. मात्र त्याचा आपल्याला उत्तर देता येत नाही. काँग्रेसने या देशाला सक्षम देश तयार करून दिला आहे. हा स्वातंत्र्यानंतर विचित्र होणारी ही निवडणूक आहे म्हणून शिवाजी महाराजांचे म्हणून लढायचे आहे. त्यासाठी या प्रशिक्षणाचे माध्यम येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान वाढविण्याची ताकद आहे  म्हणून काँग्रेसने ६० वर्षात काय केलेल्या कार्याचा याचा लेखा जोखा बूथ निहाय कशा पद्धतीने जनतेपर्यंत पोहचावायचा आहे व हे मतदान वाढवण्यासाठी कॉडेनेटर यांना हे प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  दरम्यान काँग्रेसने ६० वर्षात सक्षम देश तयार करून दिल्याच्या कार्याची तसेच अर्थव्यवस्थेत भयानक स्थिती निर्माण झाल्याने शेअर बाजार कोसळे, अर्थव्यवस्थेचा सर्वसामान्यांना कसा फटका बसला, इंड्रस्टीरीज बंद पडत आहे,बंद पडलेल्या कार डीलर शिप आदींचा लेखा जोखा यावेळी सेक्टर इनचार्ज यांना शिबिरात प्रोजेक्टर वर दाखविण्यात आला यावेळी व्यासपीठावर माजी आ. शिरीष चौधरी,  तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी यावल तथा गटनेता जि.प प्रभाकर सोनवणे,  कृ.उ.बा सभापती पी. सी.पाटील,  जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील,  माजी नगराध्यक्ष हरिष गणवानी, माजी प.स.सभापती लिलाधर चौधरी,  इस्माईल तडवी, रावेर तालुका काँग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, चंद्रकला इंगळे यांच्यासह रावेर विधानसभा क्षेत्रातील सेक्टर इनचार्ज व पदाधिकारी, फ्रेंटलचे अध्यक्ष व पदाधिकारी विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version