Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव भाजप तालुकाध्यक्षपदी जिजाबराव पाटील यांची फेरनिवड

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ पदाधिकारी जिजाबराव पाटील यांची फेरनिवड जाहीर करण्यात आली आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील (जळकेकर महाराज) यांनी नुकतीच जिल्ह्यातील तालुकाध्यक्षाची यादी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार व ना.देवेंद्रजी फडणवीस, ना.गिरीश  महाजन,प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी तथा संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्या सूचनेनुसार नवनियुक्त तालुकाध्यक्ष नियुक्त केले.त्यानुसार धरणगाव तालुकाध्यक्ष पदी पुन्हा जिजाबराव पाटील यांची फेरनिवड करण्यात आली.

दरम्यान, या नियुक्तीबद्दल जिजाबराव पाटील यांचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज भाजपचे जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, पी.सी.आबा पाटील,विधानसभा निवडणूक प्रमुख चंद्रशेखर दादा अत्तरदे,शिरीषआप्पा बयास,जिल्हाउपाध्यक्ष अँड संजयभाऊ महाजन, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कौतुक केले आहे.

Exit mobile version