Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल शहरात पुनश्च कोरोना संसर्ग : पती पत्नीचा चाचणी अहवाल आला पॉझिटिव्ह

यावल, प्रतिनिधी । येथील तालुक्यात मोठया वेगाने शिरकाव करणाऱ्या कोरोना विषाणु संसर्गाने पुनश्च यावल शहरात दोन रुग्ण बाधीत आढळुन आल्याने पांडुरंग सराफ नगर मार्गाने प्रवेश केला असून शहरातील कोरोना बाधीत रुग्णसंख्या ५१वर पहोचली आहे.

यावल शहरात कोरोना बाधितांची संख्या ५१वर पोहचली असून यातील ३९ रुग्णांना उपराचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. ६ रुग्ण कोवीड सेंटरला उपरार्थ दाखल आहे तर ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. दरम्यान मागील चोवीस तासात तालुक्यात ६ रुग्ण आढळून आले आहे. यावल तालुक्यात कोरोना विषाणु संसर्गात अडकलेला बाधीत रुग्णांची संख्या ३५० वर पहोचवर पहोचली आहे. यावल तालुक्यात सर्वाधीक बाधीत रुग्णांची संख्या साकळी येथील रूग्णसंख्या ७७ असून यातील ६० रुग्ण उपराचाअंती परत आले आहेत. यातील ४ रुग्ण मरण पावले आहेत. मागील २४ तासात यावल शहरात २, भालोद १ चितोडा १, चिंचोली १, किनगाव१ अशी नवीन रुग्ण आढळुन आली आहे.

Exit mobile version