Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपघातग्रस्तांना रवींद्र पाटील यांचा मदतीचा हात

ravindra chudaman patil chalisgaon चाळीसगाव प्रतिनिधी । उलटलेल्या इंडिकातील सर्व जखमींना रूग्णालयात दाखल करून येथील बाजार समितीचे सभापती रवींद्र चुडामण पाटील यांनी मानवतेचे दर्शन घडविले आहे.

याबाबत वृत्त असे की, येथील हॉटेल साई वैभव आणि गायरानच्या मध्ये रात्रीच्या सुमारास एक इंडिका कार अचानक उलटल्याने यातील सर्व जण गंभीर जखमी झाले. वेदनेने कण्हत त्यांनी लोकांना मदत मागितली तरी कुणी थांबले नाही. हे सर्व जण रक्तबंबाळ अवस्थेत असल्यामुळे त्यांच्या जवळ एकही वाहनचालक थांबत नव्हता. दरम्यान, उंबरखेड येथील रहिवासी तथा चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र चुडामण पाटील हे येथून जातांना त्यांच्या दृष्टीस हा प्रकार पडला. त्यांनी सर्व जखमींना आपल्या कारमध्ये घेऊन धुळे येथील रूग्णालय गाठले. दुर्दैवाने रूग्णालयात पोहचण्याआधीच जखमी झालेल्या एक वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. तथापि, वेळीच उपचार मिळाल्याने इतरांचे प्राण वाचले.

संबंधीत इंडिका कार नेमकी कशामुळे उलटली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र रवींद्र पाटील यांनी वेळीस माणुसकी दाखवून जखमींचे प्राण वाचवले. दरम्यान, इंडिका कारमध्ये मुस्लीम धर्मीय कुटुंब प्रवास करत होते. त्यांचे प्राण रवींद्रआबांच्या मानवतावादी मदतीमुळे वाचले. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

Exit mobile version