Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फळ पीक विम्याचे पैसे त्वरीत द्या अन्यथा आंदोलन : सभापती रवींद्र पाटील यांचा इशारा

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील शेतकर्‍यांना फळपीक विम्याचे पैसे तात्काळ मिळण्यात यावे अन्यथा आपण उपोषण करू असा इशारा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र ( छोटु भाऊ ) सुर्यभान पाटील यांनी जळगाव जिल्हा कृषी अधिक्षक संभाजी ठाकुर यांना निवेदनातून दिला आहे.

रवींद्र पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील शेतकरी सर्वांनी फळपिक विमा योजना सन २०१९-२०२० मध्ये रब्बी (अंबिया बहार) केळी या पिकावर घेतलेली होती. जुन २०२० मध्ये वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी आम्ही सर्व शेतकर्‍यांनी सबंधित विमा कंपनी प्रपत्र-०२ भरुन माहिती सादर केलेली होती. त्यानसार सदर कंपनीचे प्रतिनिधी यांनी नुकसान ग्रस्त भागांचे प्रचंनामे करुन गेलेले आहेत. तरी काही शेतकरी वर्गाचे वादळाचे पैसे खात्यात जमा केले व त्यातील काही शेतकरी वर्गाचे आजपावेतो खात्यात रक्कम जमा झालेले नाहीत.

संबंधीत विमा कंपनीकडे पाठपुरावा केला असता पुढील महिण्यात जमा होतील असे सांगुन देखील आत जुलै महिना आलेला आहे. या कंपनीने जळगाव व रावेर तालुक्याील शेतकरी वर्गाचे पैसे प्राप्त झालेले असुन विचारणा केली असता कुणाचेही पैसे येणार नाहीत असे उडवा-उडवीचे उत्तरे मिळत असल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. तरी सबंधित शेतकरी वर्गाचे वादळी वार्‍यात अडकलेली रक्कम मिळावी यासाठी आपली मदत मार्गदर्शन व पाठपुरावा करण्यात यावा अन्यथा आपण शेतकर्‍यांसोबत उपोषणाला बसू असा इशारा शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांनी दिला आहे.

Exit mobile version