Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी रवींद्र नाना पाटील

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीसपदी तालुक्यातील साकेगाव येथील निवासी तथा माजी जि.प. गटनेते रवींद्र नाना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फुट पडून दोन गट झाल्यानंतर तात्काळ रवींद्र नाना पाटील यांनी अजितदादा पवार गटाला पाठींबा दिला होता. यानंतर त्यांची जळगाव जिल्हाध्यक्ष ( रावेर लोेकसभा मतदारसंघ ) या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर मात्र या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती.

या अनुषंगाने आज आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने. रविंद्र नाना पाटील यांची पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी रवींद्र पाटील यांचे सहकार्य लाभेल, असा विश्वास व्यक्त करत प्रदेशाध्यक्षांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. अनिल पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, उमेश नेमाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version