Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी स्विकारला पदभार

ravikant sonavne

यावल प्रतिनिधी । पोलीस निरिक्षक रविकांत अमृत सोनवणे यांनी आज यावल पोलीस स्थानकाचा पदभार स्विकारला आहे.

 

 

येथील पोलीस स्टेशनला मागील दोन वर्षापासुन कार्यरत असलेल वरिष्ठ पोलिस निरिक्षक डी.के.परदेशी यांची सूमारे एक महीन्यापुर्वोच जळगाव येथे अचानक बदली झाल्यापासून पोलीस निरीक्षक पद हे रिक्त होते. तर या रिक्त असलेल्या पदावर जळगावमधून बदली होवुन आलेले पोलीस निरिक्षक रविकांत अमृत सोनवणे यांनी आज यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पदाचा कारभार सांभाळला आहे. मागील एक महिन्यांपासुन पोलीस निरिक्षक पद रिक्त असल्याने कायदा सुव्यवस्था डळमळीत झाला होता. पो.नि.रवीकांत सोनवणे यांच्याकडुन यावल तालुक्यातील कायद्या संदर्भातील प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा तालुक्यातील नागरीकांनाकडून होत आहे.

Exit mobile version