Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरातून चोरीस गेला ट्रकसह चार संशयित अटकेत

raver police station news

रावेर प्रतिनिधी । महिन्याभरापुर्वी शहरातील महाजन हॉस्पिटलसमोर उभा ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील चोरी गेलला ट्रकसह चौघांना अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील शेख एजाज शेखफायज वय-32 रा. इमामवाडा यांच्या मालकीचा ट्रक (एमएच 19 सीवाय 2603) 4 लाख 25 हजार रूपये किंमतीचा ट्रक महाजन हॉस्पिटल समोर पार्किंगला लावला होता. 26 ऑगस्ट 2019 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी उभा ट्रक चोरून नेला होता. याप्रकरणी रावेर पोलीस स्थानकात गुरनं 149 /2019 कलम 379 भादंवि प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर रावेर पोलीसांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार सलीमशहा रमजानशहा (वय- 50) रा. इंदौर मध्यप्रदेश, अकील मोहमद नबी मोहमद (वय-38) रा. धार, इंदौर मध्यप्रदेश, जितेंद्र कैलास धारेकर (वय-34) रा. इंदौर मध्यप्रदेश, नवाब आता मोहमद मंसुरी (वय-45) रा. इंदौर मध्यप्रदेश, अश्या चार आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातील ट्रक हस्तगत करण्यात आला. या संशयित आरोपींविरोधात मध्यप्रदेशातील किशनगंज येथील पोलीसात देखील गुन्हा दाखल आहे. ही टोळी अंतरराज्यीय असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. विभागीय पोलीस अधिकारी श्री.पिंगळे, पोनि रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सानप, पोकॉ सुरेश मेढे, पोकॉ तुषार मोरे करीत आहेत.

Exit mobile version